"पंचनामा "
गोपुनाना विदर्भातून मुलाला भेटण्यास म्हणून आले, आणि परत माघारी निघाले पण नागपुरा ऐवजी ते सरळ सरकारी हॉस्पिटल मध्ये पोहचले. त्याच झाल असं. गोपुनाना पाच दिवसापूर्वी नवी मुंबईतील आपल्या मुलाकडे त्याच्या आग्रहाखातर नवीन घराच्या वास्तू शान्त साठी आले होते. सर्व समारंभ आटोपून, तीन - चार दिवस नातवाबरोबर खेळून ते परत जाण्यासाठी संध्याकाळच्या रेल्वेने निघायचे म्हणून मुलासोबत बाहेर पडले. पण त्यांनी स्वतःला रात्री ११ च्या सुमारास पहिले ते हॉस्पिटल च्या कॉटवर. उजवा पाय प्ल्यास्टर मध्ये गुंडाळून वर लटकवलेला, डाव्या हाताला पट्ट्या लावलेल्या.
नानांनी थोडीसी जाग येताच बाजूला पहिले. त्यांचा मुलगा चंद्रकांत बाजूला स्टुलावर बसला होता . चिंताक्रांत मुद्रेने तो नानांकडे पाहत होता . त्याच्या कपाळावर पट्टी लावली होति. नानांची हालचाल पाहताच तो उठून त्यांच्या अगदी जवळ गेला.
"नाना दुखतंय का हो ? त्याने काळजीने विचारले.
"हो पायाला ठणका मारतोय, पण हे सर्व कस झाल ? मला काही कळलंच नाही " नाना.
चंदू काही बोलणार तेवढ्यात नर्स आली. २०-२२ वर्षाची, सावळी, तरतरीत. चंदू तिच्या शिस्तबद्ध हालचालीकडे पाहताच राहिला.
तिने सलाईन चेक केल. बी. पी. चेक केल आणि नानांच्या अगदी जवळ जावून अतिशय प्रेमाने विचारलं .
"अंगल आपका शादी मी तगलीफ हे ग्या ?' नर्स
नानांना तर काहीच कळल नाही,ते फक्त तिच्याकडे पहात राहिले. चंदू देखील बुचकळ्यात पडला ?
पण लगेच सावरून म्हणाला " नही नही, उनके श्यादी मी कोई तकलीफ नही है, उनकी औरत बहोत साल पहले गुजर गई है, तो अभी कोइ तकलीफ नही है."
हे सर्व त्या नर्स च्या डोक्यावरून गेल. तिने फक्त एवढंच म्हटलं "य "
चंदुला देखील काय बोलावे ते कळेना. दोघ येकामेकानाकडे पहात राहिले. नाना एकदम बावचळले.
"अरे चंदू, ती काय म्हणतेय ते एकदा समजून घे बुवा' नाना.
"अं हो हो' चंदू .
इतक्यात ती नर्स वळली आणि बाहेर जाता जाता बोलली " ठीग हें, अबी दवा दि हें, कूच तगलिफ़ हें तो बोलना " अस बोलून ती सटकली. चंदू तिच्या जाण्याकडे कितीतरी वेळ पाहतच राहिला. त्याला बराच वेळ ती काय बोलून गेली ते कळलेच नाही.
थोड्या वेळातच नानांना पुन्हा ग्लानी आली आणि ते पेंगू लागले, चंदू देखील दमला होता तो देखील डुलकी घेण्यासाठी रेलून बसला.
काही वेळ गेला नाही तोच चंदू एकदम दचकुन उठला, त्याला कारणही तसेच होते. एकदम दोन पोलिस त्याच्या अगदी जवळ येवून विचारात होते.
" इधर गोपुनाना हम्पेलवार कौन हे ? .
पोलिस पाहताच चंदू खुर्चीतून उठला. त्याच खुर्चीत त्यात वरिष्ठ दिसणारा एक पोलिस बसला. उभ्या असलेल्या पोलिसाने पुन्हा एकदा जोरात विचारले "इधर गोपुनाना म्हम्पेलवार कौन हे ?
चंदू तत्परतेने बोलला " हे आहेत".
"हे कोण आहेत ? पोलिस
" हे माझे वडील आहेत " चंदू
"मग गोपुनाना हम्पेलवार कुठे आहेत " पोलिस
" अहो हेच गोपुनाना आहेत, तेच माझे वडील आहेत " चंदू
" अस होय, मग त्यांना सांगू देना, तुम्ही का मध्ये मध्ये बोलताय ?" पोलिस,
"अहो ते … " चंदू
"बघा परत मध्ये मध्ये, साहेब रागावतील हा !' पोलीस
इकडे गोपुनाना पूर्णपणे गुंगीच्या अमलाखाली होते, आपल्या आजूबाजूला काय चाललंय याचा त्यांना काही पत्ता नव्हता.
पोलिसाने आपला मोर्चा गोपुनानाकडे वळवला.
हातात पेपर प्याड आणि पेन घेवून तो गोपुनानाकडे न पाहताच सुरु झाला " ह बोला आपणच गोपुनाना हम्पेलवार का "?
" अहो काका झोपताय काय, मी तुमच्याशी बोलतोय," पोलीस
चंदू " हवालदार साहेब त्यांना औषधांची ग्लानी आलेय, तुम्ही जरा नंतर याल का ?
अहो नंतर काय यायला सांगताय ? हेच मोठ्या मुश्कील ने आलोय. अजून दोन तासात पांच पानचनामे करून आटोपयाचे आहेत . तुम्हाला सांगायला काय जातंय ? इथे आमची ……
इतक्यात ती नर्स पुन्हा येते. पोलीस तिच्याकडे पूर्ण निरखून पाहतो. नर्स गोपुनानाकडे जायला लागते, पोलीस आपल्या वरिष्ठ अधीकारयाकडे वळून विचारतो "साहेब यांची सुद्धा जबानी घ्यायची का ?
साहेब मोबाईल वर बोलण्यात गुंग असतात. पोलीस "साहेब यांची सुद्धा घ्यायची का ?"
साहेब हातवारे करूनच विचारतात "काय "
पोलीस "जबानी "
साहेब हाताने "घ्या " असे खुणावतात.
नर्स नानांना औषधे देण्यात मग्न असते. पोलीस खाकरून तिचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो. पण तिचे लक्ष जात नाही.
पोलीस " बाई तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत"
नर्स पोलिसाकडे दुन्कूनही पाहत नाही. पोलीस " बाई काय बहिरी आहे का, कि मुद्धामाहून लक्ष देत नाही "
चंदू हे सर्व पहात असतो. चंदू " हवालदार साहेब तिला मराठी कळत नसावे "
पोलीस " हे तुम्हाला कस कळल ?". चंदू निरुत्तर.
'ओ म्याडम, सुनाई नही देताय क्या ?", पोलिसाने जरा दाराडवून विचारले. तसे दचकून नर्सने फक्त "यं " अस म्हणून त्यांच्याकडे अचंबित नजरेने पहिले.
" मी तुम्हालाच विचारतोय " पोलीस
"यं " नर्स
"मायला, वेड घेवून पेडगावला जातेय कि काय ?" कि य़डी कि खुळी हाय ?" पोलीस.
नर्स त्याच्याकडे नुसती पहातच राहिली.
"बरी दिसतेय" पोलीस, त्याचे वरिष्ठ खाकारले.
"नाही म्हणजे खुळी नाय हाय, शाणी आहे या अर्थाने बोललो" पोलीस.
"ह त मी काय म्हणतो, म्हराठी येत काय ? म्हराठी, म्हराठी ? पोलीस
"नही, हिंदी तोडा तोडा" नर्स.
"आईला बोंबला" पोलीस.
" ये बताव, ए पेसंट का नाम क्या हय ?" पोलीस
"घोपू नाना हम हम पल वर" नर्स
" हा समज गया, समज गया " पोलीस
" इसको भर्ती किया तब इसका तबियत कैसा था ? पोलीस
"अचा था " नर्स
" अचा था तो भरती कुं किया " पोलिस
" तबियत अचा था, लेकिन पाव को और दिमाग को लगा ता" नर्स
" साहेब हि म्हणते दिमाग ला लागल होत, म्हणजे म्हातारा यडा बिडा झाला कि काय ?" पोलिस
"अहो तीच म्हणन दिमाग म्हणजे डोकं" चंदू
"ओ तुम्ही गप्प बसा,तुम्हाला विचारू तेव्हा बोला' पोलिस " अच्चा बाई ये बताव ये अपघात कैसे हुवा ? पोलिस
"येन " नर्स.
'आईला हिला यं शिवाय काय येतच नाय, चलो जाने देव ए सब पेपर के जेरोक्ष देव " पोलिस
पडत्या फळाची आज्ञा मिळाल्यासारखी नर्स तिथून निसटली.
तेवढ्यात साहेब खुर्चीवरून उठले आणि पोलिसाला म्हणाले " मी जरा कॅन्टीन मध्ये जावून चहा पिवून येतो"
" साहेब, तुम्ही कश्याला जाताम मीच घेवून येतो ना !' पोलिस
"नको नको मीच जातो , थोडे पाय सुधा मोकळे होतील, अन अस करा मी खालीच थांबतो, तुम्ही लवकर आटोपून खालीच या " साहेब
पोलिसाने साहेबाला एक कडक सलाम ठोकला. साहेब बसले होते ती खुर्ची कॉटच्या जवळ ओडून पोलिस त्यात बसला. त्याने गोपुनानांकडे पहिले, नानांनी नुकतेच डोळे उघडले होते.
"काय काका कस वाटतंय ?" पोलिस.
नानांनी फक्त मान हलवली. "मी काय बोलतोय ते समजत का ?" पोलिस.
नाना फक्त टक लावून पाहताच राहिले.
"अहो बघा हो, हे काही बोलत नाहीत, काय डोक्यावर बिक्यावर परिणाम नाय न झाला " पोलिस चंदुला बोलला.
"अहो साहेब तसं नाहीय, त्याना औषधांमुळे गुंगी आलेय आणि पोलीस बघितल्यावर थोडं माणूस घाबरतो ना" चंदू . "त्यात घाबरायचं काय, पोलीस जनतेच्या शेवेसाठी तर असतो, काय ?, चला ते जाऊदे , तुम्ही सांगा" पोलीस.
" त्याच काय झालं... " चंदू सांगायला लागला ,
" अहो पुराण नका सांगू, मुद्द्याचं बोला, अजून पाच पंचनामे करायचे आहेत " पोलीस.
" मी यांना सोडायला निघालो होतो, सिग्नल ला थांबलो होतो, सिग्नल सुटला आणि मी गाडी सुरु केली, इतक्यात एका गाडीने मागून ठोकर मारली, आणि आम्ही दोघ पडलो" चंदू.
"ठीक आहे त्या गाडीचा नंबर सांगा, कोणती गाडी होती, रंग कोणता होता , कोण चालवत होत, पट पट सांगा " पोलिस.
"अहो आम्ही पडलो मग हे सर्व कसं बघणार " चंदू.
" असं कसं ? तुम्ही नाही सांगणार तर कोण सांगणार ? आम्ही त्यांना कस शोधायचं मग ? " पोलीस.
चंदू काय बोलणार तो गप्प उभा राहिला.
" ठीक आहे तुच्या गाडीचा नंबर आणि इतर गोष्टी सांगा.
चंदूने त्याच्या गाडीची माहिती दिली.
" आता सांगा तुम्ही काय करता ? " पोलीस.
" मी हॉटेलमध्ये मॅनेजर आहे" चंदू . " हॉटेलचं नाव व पत्ता सांगा" पोलीस. चंदूने हॉटेलचे नाव व पत्ता सांगितला.
इतक्यात ती केरळी नर्स आणि वॉर्डबॉय तिथे आले. वॉर्डबॉय नानांच्या बेड ची चादर ठीक करत होता. नर्सने पुन्हा नानांना तपासले. नाना त्या वेळी थोडे कण्हत होते. तिने पुन्हा नानांजवळ जाऊन विचारले " अँगल आपके शादीमे तगलीफ तो नही " चंदू पुन्हा बुचकळ्यात पडला.
"यांच्या लग्नाची काही भानगड हाय काय ओ साहेब ?" पोलीस.
वॉर्डबॉय हसून बोलला " अहो तसं नाही तिला विचारायचं आहे " तुमच्या छातीत दुखत वगैरे नाही ना "
आता चंदूला हसायला आले.
" आयला असं हाय होय, यांचं म्हणजे काय वेगळंच असत बायली, काय विचारातील काय नेम नाही." पोलीस.
ते दोघे आपलं काम आटोपून निघून गेले.
"हा तर मी काय विचारत होतो, तुम्ही हॉटेल मध्ये असता तर तुम्हाला पगार बी चांगलाच असेल काय ? पोलीस,
चंदू काही बोलला नाही.
" हा तर जेवण खाण तुम्हाला फुकट असेल ना ओ साहेब " पोलीस.
" फुकट नाही पण आम्हाला थोडी सूट असते " चंदू
" पण तुमच्या हॉटेलचे जेवण खूप फेमस आहे म्हणे " पोलीस .
" हो आमचं हॉटेल थ्री स्टार मध्ये मोडत, राहणं आणि जेवण दोन्ही खूप चांगल्या दर्जाचे असते आमच्याकडे " चंदू
" म्हणजे पगार सुद्धा चांगलाच असेल कि राव " पोलीस
" हो आहे ठीक आहे " चंदू ... आतापर्यन्त चंदू या सर्व प्रश्न उत्तरांना कंटाळला होता.
“हवालदार साहेब, ते जरा पंचनाम्याचे आटोपून घ्या ना, नानांना नंतर औषध देण्याची वेळ होईल आणि ते झोपून जातील” - चंदू,
“ते होय आता आटोपतो बघा” - पोलीस.
ती केरळी नर्स तेव्हड्यात आली.
“अँगल आप काना काया क्या ?” - नर्स.
“नाय नाय पंचनामा झाल्याशिवाय ते बाकी काही करणार नाहीत, काना बिना सब बादमे” = पोलीस
“यां” - नर्स
“यान, काय समजता नाय ? जावं तुम बादमे आवँ” - पोलीस
नर्स बिचारी एव्हडंस तोंड करून निगुन गेली.
“आयला यांची कंप्लेंट केली पाहिजे मानेंगमेंट ला हॉस्पिटलच्या, काय ? काय समजत नाय उमजत नाय आणि आले महाराष्ट्रात” - पोलीस.
“हो, हो, करा तुम्ही कंप्लेंट, पण हवालदार साहेब तेव्हड पंचनाम्याचे” .... - चंदू.
“तो होतोय तो, त्यात काय, लगेच करून टाकतो,” - पोलीस चंदूला मधेच अडवत बोलला.
पोलिसाने भराभर पेपर वर काही तरी खरडले.
“नानासाहेब करा सही इथे” - पोलीस नानाकडे पेपर देत म्हणाला.
"अहो साहेब
ते औषधाच्या गुंगीत आहेत ” चंदू
पोलीस स्वतःजवळ असलेला स्टॅम्प पॅड काढतो आणि नानांचा हात पकडून त्यांच्या आंगठा पेपर वर लावतो..
“साहेब असं काय करताय ? चुकीचं आहे हे , त्यांना चांगला लिहिता, वाचता येत. – चंदू .
“मी कुठे म्हणतो लिहिता वाचता येत नाही म्हूणन ? काय ? पण मी पुन्हा येणार, पुन्हा नानांना विचारणार. किट वेळ वाया जाणार आणि पुन्हा नानांना त्रास तो वेगळाच. आणि हे पहा तुमच्या समोरच लिहितो “सदर इसम सही करण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे त्यांचा मुलगा श्री चंद्रकांत हंपेलवार यांच्या समक्ष हाताच्या अंगठ्याचा ठसा घेतला असे.” – पोलीस
.चंदूने त्यांना कोपरापासून हात जोडले.
“झाला कि नाही पंचनामा झटपट ? आता तुमचा पंचनामा करतो ” – पोलीस.
“माझा ? कश्यासाठी ? – चंदू.
“ अहो साहेब मशकारी केली हो, आम्ही सुद्धा मस्करी करतो कधी कधी, काय ? शेवटी माणसाचं आहोत आम्ही सुद्धा. काय ? . “ जरा गप्पा मारूया निवांतपणे, तुमच्या सारखी मोठी
मानस रोज रोज थोडी भेटतात ? – पोलीस
.चंदूच्या चेहऱ्यावर संमिश्र भावना आल्या, आता अजून काय ब्याद आहे कि काही खोदून काढायचा प्रयत्न आहे यांचा.
“अस आहे होय, मग ठीक आहे, विचार काय ते “ – चंदू.
“हे बघा आता ते पंचनाम्याचे सर्व सोपस्कार पूर्ण झालेत आता तुम्ही सुद्धा फ्री आणि मी सुद्धा, काय ? तर आता जरा आपल्या मनमोकळ्या गप्पा मारूया , काय ? – पोलीस.
“हो ना हवालदार साहेब, तुम्ही पटापटा सर्व आटपलं , थँक्स हा” – चंदू.
“अहो काय तुम्ही पण, आमचं कामाचं आहे ते, काय ? तेव्हड तुम्ही सुद्धा आम्हाला जरा मदत करा कि राव ..” – पोलीस.
“करू कि साहेब , पण काम काय ते तरी सांगा “ – चंदू.
“काही विशेष नाही, ते जरा आमचं कुटुंब म्हणजे फॅमिली ओ, बायको म्हणत होती बरेच दिवस झाले बाहेर चांगल्या ठिकाणी जेवायला नाही गेलो, म्हणून विचार करत होतो कि पुडाच्या रविवारी तूमच्या हॉटेल मध्ये येऊ का ? – पोलीस
“ अहो येव्हडाच ना ? मग या कि, आमचं हॉटेल सर्वांसाठी खुलं आहे – चंदू.
“तस नाही साहेब, आम्ही गरीब, सरकारी नोकर, तुमचं हॉटेल एव्हडं मोठा, मोठं-मोठी मानस येतात तिथे, तिथला सर्व वातावरणच वेगळं, गडबडल्या सारखं होत, म्हणून विचारलं, काही चुकलं माकल तर तुम्ही समजावून सांगाल, म्हणून साठी” – पोलीस.
“नक्की नक्की , आणि तुम्ही माझे पाहुणे म्हणून या, तुम्हाला बिल सुद्धा द्यावं लागणार नाही” – चंदू.
“ नाही नाही साहेब आमचं बिल आम्हीच देणार, हा तुम्ही जो काही डिस्काउंट द्यायचा असेल तर नक्कीच द्या, पण जरा आम्हाला समजून घ्या, काय ? – पोलीस.
“हो हो नक्की, नक्की, यायच्या आधी एक दिवस मला फोन करा” – चंदू.
“धन्यवाद, साहेब” – पोलीस, असे बोलून हवालदार साहेब निघून गेले.
आणि अस्या प्रकारे नानांचा पंचनामा आटोपला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा